Sep 5, 2012

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर


नदीच्या पल्याड आईचा डोंगुर

डोंगरमाथ्याला देवीचं मंदीर

घालु जागर जागर डोंगर माथ्याला

घालु जागर जागर डोंगर माथ्याला



घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार

आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार



नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं

तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं

नाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला

नाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला



घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार

आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार



नवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू

हाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू

देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू, काम क्रोध परतुनि लाव तू

काम क्रोध परतुनि लाव तू, देवी माझी पार कर नाव तू



डोळा भरून तुझी मुरत पाहीन

मुरत पाहीन, तुझा महिमा गाईन

महिमा गाईन, तुला घुगऱ्या वाहीन

घुगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन

दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला

दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला



घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार

आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार



यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर

निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं

पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर

आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर



खणा-नारळानं वटी मी भरीन,

वटी मी भरीन, तुझी सेवा करीन

सेवा करीन, तुझा देवारा धरीन

देवारा धरीन, माझी वंजळ भरीन

आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला

आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला



घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार

आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार



यल्लम्मा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर

निवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं

पुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर

आई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर



पावसाळ्याचा हिशेब हा पंचांगाच्या पानात नाही मांडता येणार. त्या पावसाच्या आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक धारेत आपण स्वतःला कसं आणि किती भिजवलं आणि शेवटी आडोशाला जाऊन त्यांचा नाच पाहायचा निर्णय घेताना आपण किती सुस्नात होऊन त्यांच्यापासून विलग झालो, हे जास्त महत्त्वाचं आहे.