Jul 24, 2014

मृत्युंजय X ययाती


                  
‘ययाती’ आणि ‘मृत्युंजय’ या मराठीतील अविस्मरणीय साहित्यकृती. दोन्ही कादंबर्‍यांचे लेखक कोल्हापूरच्या सांस्कृतिक जीवनात लहानाचे मोठे झालेले. दोघेही कोल्हापूरचे. ‘ययाती’चे लेखक विष्णू सखाराम खांडेकर आणि ‘मृत्युंजय’चे लेखक शिवाजी सावंत दोघेही व्यवसायाने शिक्षक. ‘मृत्युंजय’ प्रसिद्ध झाले ते १९६७ साली. ‘ययाती’ दाखल झाले १९५९ सालात. ‘मृत्युंजय’ ७०० पानांची मार्मिक कादंबरी. ‘ययाती’ची पृष्ठसंख्या ३६१. लेखक म्हणून ५७ वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर खांडेकरांनी ‘ययाती’ लिहिण्याचे धाडस दाखविले. याउलट शिवाजी सावंतांनी वयाच्या २७ व्या वर्षी ‘मृत्युंजय’ लिहून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. कर्णाविषयी भरपूर साहित्य उपलब्ध होते, यात शंकाच नाही. ययातीविषयी कदाचित तेवढी माहिती उपलब्ध नव्हती, पण म्हणूनच प्रामाणिकपणाच्या कसोटीवर खरे उतरण्याचे ‘मृत्युंजय’पुढे मोठे आव्हान होते. तर ‘ययाती’चा विषय लेखकाला भरपूर सवलती देतो. आपला ययाती महाभारतातील ययाती नसल्याचे खुद्द खांडेकरांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. देवयानी आणि शर्मिष्ठा ही पात्रेही महाभारताच्या कथेपेक्षा बरीच भिन्न आहेत. कोणत्याही प्रमुख पौराणिक किंवा ऐतिहासिक व्यक्तींचे चित्रण करताना हवे ते बदल करण्याचा अधिकार ललित लेखकाला नसतो, हे मी मान्य करतो. कालिदासाच्या शकुंतलेच्या सौंदर्याचे संदर्भ देऊन खांडेकरांनी मर्यादाभंग करण्याचे रहस्य सांगितले आहे. लालित्यपूर्ण साहित्याची उत्तेजना चेतवून ‘ययाती’ आम्हाला मध्येच सोडून देतो. आपले गंभीर अध्यात्म आणि जीवनदर्शन घेऊन अधूनमधून कचदेव अवतरतात, पण त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचा कुठेही आग्रह दिसत नाही. मूळ महाभारतात कचदेव संजीवनी विद्या प्राप्त करून देवलोकात निघून जातात, असे खुद्द खांडेकरांनीच मान्य केले आहे, पण ‘ययाती’मध्ये देवयानीच्या वैवाहिक जीवनाला आग लावल्यानंतर आणि ती आग १८ वर्षे धुमसत राहिल्यानंतर तिला विझविण्यासाठी कचदेव तपश्चर्या सोडून येतात.

‘मृत्युंजय’ ही कर्णाची कथा प्रामाणिक आहे; शोधावर आधारित. महायुद्धापूर्वी कृष्ण आणि कर्ण तसेच नंतर राजमाता कुंती आणि दानशूर कर्ण यांच्यातील संवाद समस्त भारतीय साहित्याचा सवरेत्कृष्ट वारसा मानता येईल. ‘ययाती’मधील कोणताही प्रसंग एवढय़ा मार्मिकपणे व्यक्त झालेला नाही. एकीकडे दुर्वास आहेत, तर दुसरीकडे शुक्राचार्य. दोघेही तपस्वी क्रोधासाठी विख्यात. महाराणी कुंती आणि दुर्वास ऋषींचे अलौकिक संबंध शब्दांत व्यक्त करणे शक्य नसले तरीही वाचकांच्या मनावर कोरले गेले आहेत. शुक्राचार्य आणि देवयानीचे पिता-कन्येचे लौकिक संबंध मात्र भरपूर संवाद आणि दृश्यात्मक तो असूनसुद्धा ययातीपुत्र पुरू आणि कुंतीपुत्र कर्ण दोघेही एकच शाप भोगत आहेत. जन्मत:च पुरू आपल्या पित्यापासून आणि कर्ण आपल्या मातेपासून विभक्त होऊन एक अनामिक जीवन जगण्यासाठी अभिशापित आहेत; परंतु दोघांचीही आपल्या माता व पित्याशी भेट नियतीने लिहून ठेवली आहे. नियतीचे हे विधान म्हणजे सामान्य घटना नाही. ‘मृत्युंजय’ या भेटीला एका उत्सवाच्या स्वरूपात सादर करतो. ७५ वर्षांच्या वयात कर्ण प्रथमच माता कुंतीला भेटतो. तो जेव्हा कुंतीला आई म्हणून पहिल्यांदा हाक मारतो तेव्हा असे अलौकिक दृश्य उद्भवते जणू काही साक्षात गंगामाता मोहरून गेली आहे, सूर्यदेव आपल्या पुत्राच्या आनंदातिरेकात ढोल वाजवू लागले आहेत! वयाच्या अठराव्या वर्षी पुरू जेव्हा प्रथमच त्याचे पिता आणि हस्तिनापूरचे राजा महाराज ययातीला भेटतो तेव्हा ना वेदनेचा बांध फुटत ना उत्सवाचे ढोल वाजत. जर या दृश्यात पुरूकडून पित्याचे वृद्धत्व ग्रहण करण्याची कथा जोडली गेली नसती तर बर्फाचे थंडत्वही कमी पडले असते. कादंबरी आणि कथेत एक मौलिक अंतर असते, हे मी मानतो. प्रत्येक कथेचा शेवट अकस्मात व्हायला हवा आणि कथा जिथे संपते तिथून पुढे विचार करण्यास वाचक उत्सुक व्हायला हवा. कादंबरीचा शेवट एका उत्कर्ष बिंदूवर व्हायला हवा आणि तो उत्सवपूर्ण असायला हवा. कादंबरीचा शेवट पूर्ण कथेला एका शिखरावर पोहोचविणारा असायला हवा.

‘ययाती’ ते शिखर गाठत नाही. कादंबरी अचानक संपते. कचदेवाचे उबग आणणारे दर्शन, देवयानीचे चारित्रिक परिवर्तन, सवत शर्मिष्ठाविषयी देवयानीचा नवा दृष्टिकोन आणि महाराजांची वानप्रस्थाश्रमाची गुळमुळीत घोषणा..

‘मृत्युंजय’मध्ये रणांगणात आपले सर्वस्व अर्पण करणार्‍या कर्णाचा उत्सव खुद्द भगवान श्रीकृष्ण साजरा करतात. एका महायोद्धय़ाला वीरगती लाभत असतानाचे अद्भुत वर्णन, श्रीकृष्णाकडून होणारा कर्णाचा अंतिम संस्कार, राजमाता कुंतीचा आक्रोश आणि पत्नी वृषालीची आत्माहुती! सातशेव्या पानावर कोणत्याही वाचकाला रडू कोसळावे! ‘ययाती’नेही मला अंतर्मुख केले, पण तेवढे नाही. रडविले तर नाहीच! दोन्ही आत्मचरित्रात्मक कादंबर्‍या. खांडेकर आणि शिवाजी सावंत यांच्या शैली एकच, पण ‘ययाती’ची प्रभावरेषा मला ‘मृत्युंजय’पेक्षा पुढे जात असल्याचे भासले नाही; परंतु भारतीय साहित्याचा सवरेत्कृष्ट सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार ‘मृत्युंजय’ला नाही, तर ‘ययाती’ला मिळतो. भारतीय साहित्याच्या इतिहासातील ही एक घोडचूक तर नसेल?

(भारतीय ज्ञानपीठातर्फे प्रकाशित केल्या जाणार्‍या ‘नया ज्ञानोदय’ या साहित्याला वाहून घेतलेल्या मासिकाच्या ऑक्टोबर २०११च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख)

Jul 2, 2014

मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही Part 2

विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी.

कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे

ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी

सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही

अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत.

प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विक‍ीची आणि विकीचा इतर

मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.

विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे. विकीवरही प्रियाच्या

आईवडीलांचा चांगलाच विश्वास बसला होता तर विकीच्या घरी त्याच्यापेक्षा

प्रियाचेच जास्त लाड केले जात होते. त्यामुळे दोघांचे एकमेकांसोबत एकाच गाडीवर

फिरणे, सोबत सिनेमा पाहणं नेहमीचेच झाले होते. दोघंही सिन्सियर असल्याने गेल्या

सात वर्षांपासून कुठलेही भांडण न होता त्यांची मैत्री कायम होती.

कॉलेजात विकी व प्रिया नेहमीच सोबत फिरत असल्याने त्याच्या गैरहजेरीत त्यांच्या

इतर मित्र-मैत्रिणींमध्ये त्यांच्याविषयी निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जायचे.

प्रिया दिसली रे दिसली की, विकीचे मित्र तिला ‍चिडवायचे. मात्र, प्रियाला

कॉलेजातील वातावरण चांगलेच माहित असल्याने ती त्याकडे फारसे लक्ष देत नव्हती.

मात्र, विकीच्या मनात प्रियाविषयीच्या प्रेमाचे बी पेरले गेले होते. त्यात

मित्र त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवत होते.

मग काय विकी चांगलाच फॉर्ममध्ये आला होता. नेहमीपेक्षा प्रियाची तो जरा जास्त

काळजी घेत होता. विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला

नव्हता. विकीच्या वागण्या बोलण्यात कमालीचा बदल झाला होता.

एकदा विकी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दरम्यान प्रियाला

पाहण्यासाठी मुलाकडचे आले होते व त्यांनी प्रिया पसंत असल्याचे सांगितले.

प्रियालाही तो मुलगा आवडला होता. पाहुणे गेल्यानंतर लागलीच प्रियाने विकीला

मोबाइल करून लग्न ठरल्याची बातमी त्याला सगळ्यात आधी त्याला सांगितली. प्रियाचे

लग्न ठरल्याचे ऐकून विकीच्या पायाखालची वाळूच सरकली. सात वर्षापासून प्रियाच्या

निस्सिम मैत्रीला विकी प्रेम समजून बसला होता.

मोबाईलवर तिच्याशी संवाद साधत असताना विकीची जीभ अडखळत होती. मोठ्या हिमतीने

त्याने प्रियाचे अभिनंदन केले. मात्र बाहेरगावाहून आल्यानंतर विकी प्रियाला

टाळू लागला. कॉलेजातह‍ी तो आता तिच्यासोबत न फिरता त्याच्या मित्रांमध्येच वेळ

घालवू लागला. मुकेश, मोहम्मद रफीची दुःखद गाणी ऐकायला लागला. एकांतात रहायला

लागला. प्रियाने आणि त्याच्या घरच्यांनीही त्याला खूप समजावले. पण काहीही उपयोग

झाला नाही.

प्रियासोबत घालवलेले 'मैत्री'चे क्षण विसरण्यासाठी विकीला सिगारेट ओढण्याची सवय

जडली. प्रिया रस्त्याने दिसली की, तिच्यासमोर सिनेस्टाइलमध्ये सिगारेट ओढून

मित्रांमध्ये दर्द भरे नगमे मोठमोठ्याने गायचा. त्याचे प्रियाला खूप वाईट

वाटायचे. जणू त्याचा 'देवदास' झाला होता.

मैत्री व प्रेम हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकीने आधीच प्रियाजवळ आपली

प्रेमभावना व्यक्त केली असती तर त्याच्या मनातील गैरसमज वेळतच दूर झाला असता.

सात वर्षांच्या मैत्रीची फुललेली वेल क्षणात गळून गेली नसती.

लेखक:अनामिक

मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही Part 1

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी"बेस्ट फ्रेंड"होती ...
मला ती खरच खूप आवडायची I
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....
वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
"माहित नाही का.....??":(((

कॉलेग ला असताना

माझ्या फोन वर call आला...
तिचा चा होता तो ...
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती
आणि ती मला सांगत होती तिचा ज्याच्या वर प्रेम होता त्याने कसा त्रास दिला तिला...
तिने मला भेटायला बोलवलं होत
मी तिला भेटायला गेलो...
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...
मी तिच्या साठी आणि माझ्या साठी चित्रपटाची तिकीट काढली...
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं"बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."
खूप वेळा शांत उभे होतो...
मग मी निघालो...
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...
माहित नाही का???
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडी त जायचं
ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली...
माझ्या सोबत कोणी नाही आहे... रु माझ्या सोबत येशील...
माझ्या सोबत हि कोणी नव्हत...
आम्ही दोघांनी"बेस्ट फ्रेंड्स"ह्या नात्याने जाण्याचा नित्नय घेतला ...

PROM NIGHT ला ...

prom NIGHT ला सगळ काही नित झाल..
आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...
ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...

GRADUATION दय ला ...

दिवसा मागून दिवस गेले...
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच was graduation दय आला ...
मी तिला पाहिलं ...
तीनेव साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..
माझा तिच्या वर एका तर्फी प्रेम होत पण काय करणार तिचा जमत नव्हत ना
आमची शेवरी ची भेट होणार होती...
ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...
तिने माझ्या चेहर्या वरून हात फिरवला ...
आणि म्हटली"आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला

काही वर्षांनी

मी लग्नात आलो होतो...
आणि ते लग्न होत तीच .. तिचा दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्त चा नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेव्चा निभावल....
"तू आज हि माझ्या सोबत आहेस"असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी...
मी आमच्या शाळेत एकदा गेलो ...
तिथे आमच्या वर्गातले सगळे जन आले होते...
ती हि...
तिथे प्रत्येकाने आपली लहान पाणी लिहिलेली पत्र ठेवली होती...
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...
7th:"वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा"
college year:"आज हि मी त्याला खोत सांगितलं कि माझं ब्रेअक उप झाला तरी हा वेडा माझ्या साठी आलं"
prom night"आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बगहातेय,...
मला त्याला सांगावस वाटतंय कि माझा हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."
graduation year:"किती लाजाळू आहे हा साडीत पाहून नाही काही बोलला नाही"
marriage day:"आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील....."

हे सगळं वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...
आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...
कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला..