Sep 14, 2011

वो लम्हे...

खूप वर्षं एकमेकांच्या सोबतीनं व्यतीत केली असताना तुमच्या भावनांची गुंतवणूक झालेलं नातं एका झटक्यात तोड
णं कठीण असतं. त्या नात्यातल्या अनेक गोष्टींनी तुम्हाला आनंद दिलेला असतो. याच चांगल्या गोष्टींची आठवण सदैव ताजी राहावी म्हणून आपल्या 'एक्स'च्या संपर्कात राहणं हवंहवंसं वाटू लागतं; पण ही वाट सोपी मुळीच नाही, हे लक्षात ठेवलेलं बरं !
...........

चढउतार हे प्रत्येक नातेसंबंधात असतात; पण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा पती-पत्नीचं नातं हे अधिक नाजूक असतं. लग्नाआधी बॉयफ्रेंड हाच आपला 'बेस्ट फ्रेंड' म्हणणाऱ्या तमाम मुलींची लग्नानंतर नवऱ्याशी सोडाच; पण जुन्या मित्राशीही 'दोस्ती' राहात नाही. मग 'ब्रेकअप के बाद'मुळे जन्माला आलेल्या नात्यातील 'एक्स'पुन्हा मैत्रीचे बंध जुळणं कितपत शक्य आहे?

याचं सध्याचं ताजं उदाहरण म्हणजे रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण. गेली कित्येक वर्षं 'स्टेडी रिलेशनशिप'मध्ये राहिल्यानंतर हे दोघं वेगळे झाले. आता दीपिका विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थसोबत दिसते, तर रणबीरचं नाव कतरिनाशी जोडलं जातंय. दोघांनी नवीन पार्टनर निवडल्याची चर्चा असतानाच, दीपिकानं एका वर्तमानपत्रात 'मला रणबीर खूप आवडतो आणि आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत', असं सांगून टाकलं. तिकडे शिल्पा शेट्टीनंही स्वत: प्रोड्युसर असणाऱ्या चित्रपटात अक्षयला घ्यायला आवडेल, असं सांगितलं आणि अक्षयनंही लागलीच चांगली स्क्रिप्ट असेल, तर शिल्पासोबत काम करायला आपली काहीच हरकत नाही, असं जाहीरही करून टाकलं. सुश्मिता सेन, पूजा बेदी या दोघीही 'एक्स बॉयफ्रेंड आमचे खूप चांगले मित्र आहेत', असं दिलखुलास सांगतात. पूवीर्च्या कडू आठवणी विसरून मैत्रीचा हात पुढं करणं, ही चांगली बाब असली, तरी प्रत्येकालाच ही 'हेल्दी रिलेशनशिप' टिकवणं सोपं जातंच असं नाही.

मानसोपचारतज्ज्ञही या बाबतीत 'जरा संभालके' पावलं टाकण्याचा सल्ला देतात. ब्रेकअपनंतर त्या व्यक्तीशी रिलेशन कसं ठेवायचं, हे त्या-त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटी आणि स्वभावावर अवलंबून असतं. तुम्ही खूप हळवे असाल, तर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ब्रेकअप झालं असेल, तर त्याच्या किंवा तिच्यापासून तीन-चार महिने लांबच राहिलेलं बरं. कारण ज्या कारणामुळे तु ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलात, तेच तेच प्रॉब्लेम पुन्हा उद्भवण्याचा धोका यात असतो,' असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

काही वेळा आपल्य पार्टनरपेक्षा उजवी व्यक्ती भेटली जाते आणि आधीच्या पार्टनरला डच्चू दिला जातो. अशा रिलेशनशिप्समध्येही दोघांमध्ये तुलना केली जाण्याचा धोका असतो. अशा वेळी स्वत:मध्ये 'डिफेन्स मॅकेनिझम' येतो. ती मुलगी तशीच होती. बरं झालं मी तिला सोडलं, अशी वाक्यं स्वत:चं समाधान करण्यासाठी गरजेची असतात; पण हे 'डिफेन्स मॅकेनिझम'जास्त प्रमाणात केलं, तर त्याचे सध्याच्या रिलेशनशिप्सवरही खूप वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. याचे उमटणारे उलट पडसाद म्हणजे, त्या व्यक्तीबद्दलचा पराकोटीचा द्वेष आणि तिरस्कार. 'मला इथे इतका त्रास होतोय आणि तो मात्र मजा मारतोय' ही भावनाही त्याचं आयुष्य पोखरण्यास कारणीभूत ठरते, असं गौरी सांगतात. मग, केवळ त्या दोघा 'एक्स'मध्येच नव्हे, तर दोघांच्याही 'पार्टनर'च्या मनात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होतो. मध्यंतरी रवीना टंडननं रागाच्या भरात एका पाटीर्त आपल्या नवऱ्याच्या माजी पत्नीवर पाण्याचा मगच उलटा केला होता. हे तिनं नंतर हसत हसत सांगून टाकलं, तो भाग अलाहिदा.

अॅक्टर आणि मॉडेल दिनो मोरियानं आधी बिपाशा बसु आणि नंतर लारा दत्ताशी सूर जुळवले; पण त्यांचं ब्रेकअप झालं. अशी अनेक ब्रेकअप्स त्यानं पचवली आहेत. 'मी कॉलेजमध्ये असताना माझं पहिलं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर त्याच्याशी 'डील' करणं मी शिकत गेलो. जसं जीवनात येणाऱ्या प्रत्येक वादळाशी सामना केला जातो, तसंच मी या ब्रेकअपशी दोन हात केले. यामुळे काही वेळा खूप दु: ख झालंही; पण या परिस्थितीशी धीराने सामना केला पाहिजे,' असं दिनो सांगतो.

' एक्स'बरोबर परत मैत्री करायचीच असेल तर काही नियम पाळलेले बरे :

* रुटीन लाइफ पुन्हा ट्रॅकवर आणायचंय, तर अशा परिस्थितीत 'एक्स'ला स्थान न दिलेलंच बरं. तु ही रडा, खूप जोराने ओरडा, दु:ख व्यक्त करा पण 'एक्स'बरोबर काहीही शेअर करू नका.

* स्वत:शी प्रामाणिक राहा. 'एक्स'बरोबर परत दोस्ती करण्यापूवीर् आधी स्वत:ला विचारा. तुम्हाला एकमेकांची खरीच मैत्री करायची आहे, की पुन्हा एकत्र येण्यासाठी मैत्रीचा मुखवटा चढवला जातोय. जर उत्तर 'हो'असेल तर मैत्रीचा विचार सोडून द्या.

* ' एक्स'बद्दलच्या चांगल्या वाईट भावना मनातून काढून टाका. 'एक्स'शी मैत्रीचा हात पुढं करताना तु ही हे स्वीकारलं पाहिजे, की तुमच्यातलं 'रोमँटिक' नातं आता अस्तित्वात नाही. पूवीर्चं नातं का यशस्वी ठरलं नाही आणि आताचं नातं यशस्वी ठरेल का असा विचार अजिबात करू नका.

* ' एक्स'शी मैत्री करताना त्याच्याशी केवळ मैत्रीच्या भावना असल्या पाहिजेत, सेक्शुअल नाही हे पक्कं ध्यानात ठेवा.

* ' एक्स' मैत्री करताना तुमचं नवं नातं संकटात येत असल्यास ते टाळणंच योग्य. तुमच्या सध्याच्या पार्टनरला परिस्थितीची जाण हवी आणि त्याला विश्वासात घेणं गरजेचं आहे. नव्या पार्टनरशी बोलताना 'एक्स'बरोबरच्या खासगी गोष्टी सांगणं टाळा.

' एक्स' शी मैत्री करताना ' युच्युअल अंडरस्टँडिंग' खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यामध्ये पक्क्या सीमारेषा आखालेल्या हव्यात आणि त्याचं काटेकोर पालन व्हायला हवं. दोघा 'एक्स'नी समंजसपणानं नातं सांभाळलं तर, या कडवट 'ब्रेकअप' रुपांतर चांगल्या मैत्रीतही होऊ शकतं.

No comments:

Post a Comment